घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक
दोन गुन्हे उघड : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबागमधील हसनी आश्रम, विजयनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत 46 हजारांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
मुनिब ऊर्फ बाब्या मुस्ताक भाटकर (वय २०, रा. जयहिंद मस्जिदजवळ, शामरावनगर, सांगली), सार्थक सुनिल सुतार (वय २१, रा. रामरहीम कॉलनी, गल्ली नं. २, संजयनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विजयनगर येथील गणेश मुळीक तसेच हसनी आश्रमजवळील विजयलक्ष्मी कुमारमठ यांच्या घरातील दागिने अज्ञातानी लंपास केले होते. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना निरीक्षक भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेतील प्रशांत माळी यांना भाटकर आणि सुतार हे दोन सराईत गुन्हेगार चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी धामणी रोड परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी दोन घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून 46 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
सांगलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतेज कार्वेकर, दिनेश माने, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, योगेश पाटील, सचिन घोदे, उमेश कोळेकर, लालासाहेब सय्यद, आनंद संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.