Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालयात संचालक प्रशांत आवधूत व प्रा. प्रियदर्शनी पाटील यांचा गौरव

डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालयात संचालक प्रशांत आवधूत व प्रा. प्रियदर्शनी पाटील यांचा गौरव

सांगली : खरा पंचनामा 

तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालय, कसबे डिग्रज येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दुहेरी यशामुळे अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे विश्वस्त सदस्य मा. प्रशांत आवधूत यांची कसबे डिग्रज–नांद्रे विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ६००० पेक्षा अधिक मतांनी निवड झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा. प्रियदर्शनी पाटील यांनी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रशांत आवधूत यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व विकासाभिमुख कार्यातून समाजाशी दृढ नाते निर्माण केले असून त्यांच्या विजयाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रा. प्रियदर्शनी पाटील यांनी विकसित केलेला अभिनव संशोधन प्रकल्प राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत पीएच.डी. श्रेणीत द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या वतीने त्यांना एक लाख रुपये फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. नाभीमार्गे औषध वितरणावर आधारित त्यांच्या संशोधनामुळे प्रथम-प्रवेश चयापचय टाळण्याची अभिनव संकल्पना अधोरेखित करण्यात आली आहे.

दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रशांत आवधूत व संस्थापक डी. डी. चौगुले यांच्या हस्ते प्रा. प्रियदर्शनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी उपाध्यक्ष पोपटराव डोरले, सचिव अजितप्रसाद पाटील, विश्वस्त सदस्य मिलिंद भिलावडे, महावीर चौगुले, नितीन चौगुले उपस्थित होते. तसेच या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण वाडकर, सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.