Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस दल पेट्रोलपंप प्रकरण : एक कोटी 33 लाख घेऊन उपनिरीक्षक पसार'वेल्फेअर' पोलिस निरीक्षक, लेखा परीक्षक संशयाच्या फेऱ्यात

पोलिस दल पेट्रोलपंप प्रकरण : एक कोटी 33 लाख घेऊन उपनिरीक्षक पसार
'वेल्फेअर' पोलिस निरीक्षक, लेखा परीक्षक संशयाच्या फेऱ्यात 

जळगाव : खरा पंचनामा 

जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन (वेल्फेअर) विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालवला जातो. या पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नियुक्त उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (वय ५७) हा तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार करून पसार झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून हा सर्व प्रकार सुरू होता. याच कालखंडात जबाबदारी असलेले वेल्फेअर विभागाच्या निरीक्षकांसह अपर अधीक्षक, पोलिस अधीक्षक आणि उपमहासंचालकांचे नुकतेच 'इन्स्पेक्शन' झालेले आहे. त्यांच्या कार्यालयातून तपासणी करण्यासाठी आलेले लिपिक, संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात कसा आला नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ या उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आली होती. पेट्रोल, डिझेल विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम त्याने स्टेट बँकेच्या संबंधित खात्यात नियमित जमा करणे आणि त्याचे अचूक जमाखर्चाची नोंद ठेवण्याची त्याची जबाबदारी होती. मात्र, ७ एप्रिल २०२५ पासून ते गुन्हा दाखल होईस्तोवर दहा महिन्याच्या कार्यकाळात त्याने हिशेबात हेरफेरी करून तब्बल १ कोटी ३३ लाख ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.

वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याने १२ फेब्रुवारीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वडील कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. तसेच त्यांनी पेट्रोलपंपाच्या हिशेबात मोठी गडबड झाली असून, मी त्यात पूर्णपणे अडकलो असल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी तत्काळ पेट्रोलपंपावरील व्यवहारांची खात्री करण्याचे आदेश मानवसंसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले. तपासणीवेळी पेट्रोलपंपाच्या तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये आढळले. मात्र बँकेत भरणा केल्याचे पावती पुस्तक व इतर दस्ताऐवज तेथे नव्हते. त्यामुळे पंपाचे लेखापरीक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केले असता एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची रोख विक्री झाली व त्यापैकी ३ कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपये बँकेत प्रत्यक्ष जमा केले. मात्र उर्वरित १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत. वाघ हे सध्या पसार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रियादेखील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुरू करण्यात आली आहे.

पेट्रोलपंपावरील रोख रक्कम वेळोवेळी बँकेत भरणा करण्याबाबत वाल्मीक वाघ यांना प्रभारींनी सूचना देण्यासह रोखवही व भरणा पावती पुस्तक दाखविण्याविषयी सांगितले. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळे बहाणे करून रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ करीत होते, असेही फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.