Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

१० वर्षानंतरही न्याय नाही, अश्विनी बिद्रेच्या कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

१० वर्षानंतरही न्याय नाही, अश्विनी बिद्रेच्या कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

कोल्हापूर : खरा पंचनामा 

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. कुटुंबीयांनी देशाच्या द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे.

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही, असा दावा करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10वर्षे उलटले, न्यायालयाने खून झाल्याचे स्पष्ट केले, तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे.

यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलीसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.