Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब

युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब

मुंबई : खरा पंचनामा 

आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णायक ठराव सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला गेला. त्यामुळे आता पार्थ पवार राज्यसभा खासदार म्हणून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात समोर येत आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर सर्वसमावेशक शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कोअर कमिटीचे इतर सदस्य उपस्थित होते.

तसेच, या बैठकीत 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भातील तयारीबाबत देखील चर्चा करण्यात आली. पक्ष नियोजनानुसार, काही दिवसांत वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली जाईल, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होईल. या निर्णयामुळे पक्षाच्या नेतृत्वात आणि आगामी राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत स्थिरता निर्माण होईल, तसेच पक्षाचे आगामी धोरण आणि संघटनात्मक रूपरेषा अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.