राज्यातील 'या' महापालिकेत पहिला सिंधी महापौर
अमरावती : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीमध्ये 29 पैकी 27 ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळाले. राज्यात जरी एकत्र असले तरी महापालिका निवडणुकीत एकमेकांवर या तीनही पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. काही ठिकाणी एकत्र लढले तर काही ठिकाणी विरोधात यामुळे मोठा मतदारांमध्येच संभ्रम निर्माण झाला होता. निकाल लागल्यानंतर देखील महापौरपदावरून रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी अद्यापही हा तिढा सुटत नाहीये.
तर मुंबई महापौरपदावरून मोठे राजकारण पेटले होते. मराठी, हिंदू, मुस्लिम की उत्तरभारतीय बसणार यावरून खडाजंगी पाहायला मिळाली. अजूनही मुंबई महापालिकेचा महापौर निश्चित झालेला नाहीये. दरम्यान अमरावतीमध्ये भाजपने मोठी खेळी खेळली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी, आणि शिवसेना शिंदे गट अशाप्रकारे सत्ता स्थापन होणार आहे. तर आज भाजपच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुरुवातीचे अडीच वर्ष भाजप घेणार आहे.l
सुरुवातीचे सव्वा वर्षात भारतीय जनता पार्टीचे श्रीचंद तेजवानी आणी दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचे आशिष अतकरे हे महापौर होणार आहेत. महाराष्ट्रात भाजपने सिंधी समाजाचा पहिला महापौर श्रीचंद तेजवाणी यांना संधी दिली आहे.
6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी आज भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहेत. दुसऱ्या अडीच वर्षात युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला महापौर पद देण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.