Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वर्ष संपत आले तरी सारथीकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाहीजयंत पाटलांनी मंत्र्यांना धरले धारेवर

वर्ष संपत आले तरी सारथीकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही
जयंत पाटलांनी मंत्र्यांना धरले धारेवर

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेकडून पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत वर्ष संपत आले तरी सरकारने शिष्टवृत्ती मंजूर केली नाही, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले.

शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागत असल्याची परिस्थिती त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती केव्हा मिळणार, सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु राहणार आहे का, असे प्रश्न उपस्थित करुन त्यांनी सरकारचे शिक्षण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष्य होत असल्याचा आरोप केला.

विधानसभेत प्रश्नात्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील यांनी सारथी अंतर्गत २०२५-२०२६ वर्षात पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना राबवली गेली नाही, यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. सरकारने 5 कोटी 96 लाख रुपये शिष्यवृत्ती वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र यातील 'नियोजन' हा शब्द गडबड करणारा आहे. पुरवणी मागणीत त्याचा उल्लेख आहे का? आता फेब्रुवारी सुरु आहे. वर्ष संपल्यानंतर शिष्यवृत्ती दिले जात आहे. साधारणपणे वर्ष सुरु होण्यापूर्वी शिष्यवृत्ती दिली पाहिजे, सप्टेंबरपूर्वी शिष्यवृत्ती दिली पाहिजे होती. पुढच्या वर्षी तरी वर्षारंभी शिष्यवृत्ती मिळणार का? शिष्यवृत्ती केव्हा मिळणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करत सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु राहणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या नियोजनावरच जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली.

राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी सरकारवर बाकीचे दायित्व मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे यावर्षी जाहिरात काढण्यात आली नव्हती, असे उत्तर दिले, यावरुन जयंत पाटील, महाराजांच्या नावाने सुरु असलेली शिष्यवृत्ती योजना बंद केली, आता सारथीची शिष्यवृत्तीही बंद करणार का, असा असा थेट सवाल अभिजीत पाटील यांनी केला. त्यावर मंत्री जयस्वाल म्हणाले, यापूर्वी 300 कोटी रुपये सारथीसाठी दिले जात होते, डिसेंबरच्या अधिवेशनात त्यात 100 कोटींची वाढ करुन 400 कोटी रुपये सारथीसाठी देण्यात आले आहेत. आजच 31 मार्च पूर्वी जाहिरात काढून सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करण्यात येईल.

मंत्री जयस्वाल यांच्या उत्तरला जयंत पाटील यांनी हरकत घेतली. ते म्हणाले की, मंत्र्यांनी लिखित उत्तरात वाटपाचे नियोजन केले असल्याचे म्हटले आहे, आणि सभागृहात सांगत आहेत की आता जाहिरात देणार आहे. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेत सारथीने जे प्रस्ताव दिले ते तुम्ही वेळेवर मंजूर करत नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहात, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. मंत्री जयस्वाल यांच्याकडून मोघम उत्तर दिले जात आहे, त्यांनी स्पष्ट सांगावे की, जाहिरात कधी देणार, विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये पैसे कधी ट्रान्सफर करणार, नियोजित निधीपेक्षा जास्त अर्ज आले तर त्यासाठीचे नियोजन सरकारकडे काय आहे?

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.