Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

न्यायालयाने पोलिसाला ठोठावली १४ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने पोलिसाला ठोठावली १४ वर्षांची शिक्षा 

रायगड : खरा पंचनामा 

रायगड जिल्ह्यातील पोलिस दलात न्यायालयाच्या एका निर्णयाने खळबळ उडाली असून एका पोलिसाच्या कृत्यामुळे पोलिस दलावर दाग लागला आहे. नागेश पोपट गावडे या पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस दलातील एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

आता तब्बल १० वर्षांनी या प्रकरणात नागेश गावडे याला अलिबाग सत्र न्यायालयाने 14 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून दिड लाखाहून अधिक रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तर नागेश गावडे याने पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला होता.

याबाबत माहिती अशी की, २०१३ ते २०१५ या कालावधीत नागेश गावडे आणि फिर्यादी हे दोघेही पोलीस दलात कार्यरत होते. या कालावधीत दोघांची ओळख झाली. याच कालावधीत आरोपी गावडे याने फिर्यादी महिलेशी जवळीक साधली. तिला लग्नाचे अमिश दाखवून आधी शारिरीक संबध प्रस्तापित केले.

धक्कादायक म्हणजे त्याने त्याचे लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तसेच पिडीत महिलेच्या लक्षात न येता चित्रफीत तयार करत तिला धमकावण्याचे सत्र सुरू केले. तसेच जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात नागेश गावडे याच्यार दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अलिबागच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर तिवारी यांच्या न्यायालयात सुरू होती.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सराकरी अभियोक्ता कोमल राठोड यांचा युक्तीवाद मान्य केला. तसेच आरोपी नागेश गावडे याला दोषी ठरवत १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला इतर कलमां अंतर्गतही शिक्षा सुनावली. या निकालानंतर आता रायगड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.