Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जेफ्री एपस्टीन होता इस्रायलचा गुप्तहेर? FBI च्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

जेफ्री एपस्टीन होता इस्रायलचा गुप्तहेर? 
FBI च्या कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

दिल्ली : खरा पंचनामा

अमेरिकेतील लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनबाबत पुन्हा एकदा जगभरात खळबळ माजली आहे. नुकत्याच सार्वजनिक झालेल्या २०२० च्या एका 'एफबीआय' कागदपत्रातून असा दावा करण्यात आला आहे की, एपस्टीनचे इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'शी जवळचे संबंध होते आणि त्याला खास हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते.

एफबीआयच्या अहवालानुसार, एका गुप्त स्रोताने माहिती दिली होती की, एपस्टीन हा इस्रायलसाठी काम करणारा एक 'को-ऑप्टेड एजंट' होता. अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या तपासादरम्यान ही माहिती नोंदवण्यात आली होती. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद बराक यांच्या देखरेखीखाली एपस्टीनला हेरगिरीसाठी तयार करण्यात आले होते. बराक आणि एपस्टीन यांच्यातील संभाषणांवरून तो मोसादचा एजंट असल्याचा निष्कर्ष या स्रोताने काढला होता.

हार्वर्डचे कायदेतज्ज्ञ एलन डर्शोविट्झ आणि एपस्टीन यांच्यातील फोनवरील संभाषणे हा स्रोत ऐकत असे आणि त्यातील नोट्स काढून त्या माहिती मोसादला पुरवल्या जात असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालात 'डे वन व्हेंचर्स' या कंपनीचाही उल्लेख आहे. सिलिकॉन व्हॅलीमधून तंत्रज्ञान चोरण्यासाठी या कंपनीचा वापर केला जात असल्याचा दावा स्रोताने केला आहे. या कंपनीच्या संस्थापिका माशा बुचर या पूर्वी एपस्टीनच्या पब्लिसिस्ट होत्या आणि त्यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशीही संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, फबीआयने या कागदपत्रातून नमूद केलेल्या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. हे सर्व दावे केवळ एका गुप्त स्रोताने दिलेल्या माहितीवर आधारित आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.