IAS मिलिंद शेनॉय यांना फडणवीसांचा दणका, तडकाफडकी बदली
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रखडलेल्या फाईलींवर लगोलग स्वाक्षऱ्यांचा धडाका लावल्याच्या प्रकरणात ज्येष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक खात्याकडून झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात शेणॉय यांची तडकाफडकी बदली झाली आहे. प्रशासकीय कारणातून बदली करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्या दिवशी अपघाती निधन झाले, त्याच दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंत्रालयात मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागाने ७५ शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. याच प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय रडारवर आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा प्रकार गंभीर्याने घेतलेला होता तसेच तातडीने चौकशीचे आदेश दिलेले होते. दोषी अधिकाऱ्यांवर लगोलग कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या होत्या. त्याचसंदर्भात पहिले पाऊन म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिलिंद शेनॉय यांची बदली केली.
अल्पसंख्याक खात्याकडून झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात शेनॉय यांच्याबरोबर विभागातील आणखी कोण कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, हे देखील समोर येण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिलिंद शेनॉय ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. मिलिंद शेनॉय अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये मिलिंद शेनॉय सहभागी होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.