Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांच्या अपघाताआधीचं 'ते' ट्वीट काही मिनिटात डिलिट

अजितदादांच्या अपघाताआधीचं 'ते' ट्वीट काही मिनिटात डिलिट 

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा खळबळजनक दावे केले आहेत.

या प्रकरणात 'VSR' कंपनी आणि भाजपशी संबंधित एका 'पेड ट्रोलर'चा उल्लेख केला आहे. या ट्रोलर्सना आपली खाजगी माहिती कशी मिळते, यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी आयटी सेलच्या एका पेड ट्रोलरवर गंभीर आरोप केले आहेत. माझे आधार कार्ड आणि क्रिकेटपटू रोहित शर्माबद्दलची माहिती विनापरवाना पोस्ट केली गेली. माझे आधार कार्ड या ट्रोलर्सकडे आलेच कसे? असा सवाल त्यांनी केला. विमान मंत्रालय की 'VSR' कंपनी, यापैकी कोणी ही माहिती आयटी सेलला पुरवली का? असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. विमानतळ प्राधिकरणाची गुप्त माहिती ट्रोलर्सकडे कशी पोहोचते, याची चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

रोहित पवारांनी भाजपशी संबंधित सुमीत ठक्कर यांच्या एका जुन्या ट्विटचा संदर्भ दिला. "अजितदादांच्या अपघाताच्या दोन दिवस आधी 'महाराष्ट्रात काहीतरी मोठे घडणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो', असे ट्विट या ट्रोलरने केले होते. जे ट्वीट 7-8 मिनिटात लगेच डिलीट केले होते. हे ट्विट कोणी कोणी रि-ट्विट केले होते?" असा सवाल रोहित यांनी केला. "समीत ठक्करला आम्ही सोडणार नाही", असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.

रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. "मी अजित दादांच्या घातपाताचा विषय मांडतोय, मग भाजपशी संबंधित लोक मला ट्रोल का करत आहेत? यामुळे सामान्य जनतेच्या मनात वेगळीच शंका निर्माण होत आहे. मला वेड लागलंय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हो, मला माझ्या काकांच्या बाबतीत नेमकं काय घडलं, हे शोधण्याचं वेड लागलंय आणि मी ते शोधूनच काढणार," अशी आक्रमक भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे. घेतली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.