Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इराणचा होर्मुज समुद्रधुनीमध्ये मिसाईल हल्ला! 10 तेलवाहू जहाजे भस्मसात

इराणचा होर्मुज समुद्रधुनीमध्ये मिसाईल हल्ला! 
10 तेलवाहू जहाजे भस्मसात

दिल्ली : वृत्तसंस्था 

"मध्य-पूर्वमध्ये महायुद्धाचा भडका उडाला असून इराणने होर्मुजची समुद्रधुनी अक्षरशः 'स्मशान' बनवली आहे! युद्धाच्या सहाव्या दिवशी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने १० हून अधिक तेलवाहू टँकर्सवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करून त्यांना जलसमाधी दिली आहे.

इराणच्या विध्वंसक कारवाईमुळे जगाचा २० टक्के तेल आणि गॅस पुरवठा ठप्प झाला असून, दुसरीकडे अमेरिकेने श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणची युद्धनौका टॉरपीडोने उडवून सडेतोड उत्तर दिले आहे. रक्ताळलेल्या समद्रात सुरू असलेल्या या संघर्षाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया हादरवला आहे..."

इराणच्या IRGC नौदलाचे उपकमांडर मोहम्मद अकबरझादेह यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १० पेक्षा जास्त तेल टँकर्सना मिसाइलने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामुळे जहाजांना भीषण आग लागली असून इराणने आता या मार्गावरून जाणाऱ्या सर्व जहाजांवर पूर्णतः बंदी घातली आहे. परिणामी, कतार, इराक आणि सौदी अरबचा तेल पुरवठा अडकला आहे.

युद्धाची व्याप्ती आता खाड़ी देशांपलीकडे हिंद महासागरापर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेतील गाले (Galle) तटापासून ४० सागरी मैलावर इराणची आधुनिक युद्धनौका 'IRIS Dena' टॉरपीडोने उडवून दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.