घरफोडी करणाऱ्या दोन बांग्लादेशीना अटक : पाच गुन्हे उघड
12.30 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील संजयनगर, तासगाव, पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणाऱ्या दोन बांग्लादेशीना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणत 12.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
हिमेल फरमान सोनार (वय ३५), पोरोश शोयदुल चोकदार (वय २७, दोघेही रा. रुस्तमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तमनगर, ता. पारबतीपुरा, जि. दिनाजपुर, विभाग रंगपुर, राज्य उत्तरभंगो, देश बांग्लादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे एक पथक तयार केले होते. पथक सांगलीत गस्त घालत असताना पथकातील सागर लवटे, विक्रम खोत यांना दोघेजण शामरावनगर येथील झुलेलाल मंदिर परिसरात दोघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी दुचाकीवरून येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. दोघेही संशयित तेथे आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये चोरीचे दागिने तसेच त्यांचे बांग्लादेशचे ओळखपत्र सापडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी सांगली शहर, तासगाव, पलूस तसेच संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील दागिने, दुचाकी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, सागर लवटे, सतिश माने, मच्छिद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, अमिरशा फकीर, सागर टिंगरे, संदीप नलावडे, संदिप गुरव, उदय माळी, महादेव नागणे, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील, कैप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.