Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील शहीद जगदाळेंची लेक होणार क्लास-2 ऑफिसर, मुख्यमंत्री फडणवीसांचे आयुक्तांना निर्देश

पुण्यातील शहीद जगदाळेंची लेक होणार क्लास-2 ऑफिसर, 
मुख्यमंत्री फडणवीसांचे आयुक्तांना निर्देश

मुंबई : खरा पंचनामा 

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये, महाराष्ट्रातील देखील काही पर्यटकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, जवळचे नातेवाईक गमावले होते.

त्यामध्ये, पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकर देण्याची घोषणा केली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारने आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेत नोकरी सरकराने दिली आहे.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचे निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर जगदाळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत शहीद संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत 'प्रशासकीय अधिकारी' (वर्ग-२) म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश होता. पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया प्रलंबित होती. आसावरी जगदाळे यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांना थेट वर्ग-2 च्या पदावर सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने विशेष आदेश काढून आसावरी जगदाळे यांच्या नियुक्तीचे पत्र तयार केले आहे. आज दुपारी एका विशेष कार्यक्रमात पुण्याच्या महापौरांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आसावरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

वडील गमावल्यानंतर आसावरी आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा संघर्ष केला आहे. आज मिळालेल्या या नोकरीमुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार असून, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.