'अमली'ची गुंगी महागात!
राज्य पोलिस दलातील 17 जण बडतर्फ
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील अमली पदार्थ, विशेष करून ड्रग्जविरोधात कारवाई करताना, त्यात थेट सहभागी आढळलेल्या पोलिसांवर सेवेतून बडतर्फची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.
राज्य पोलिस दलाच्या सेवेतून अशाप्रकारे तब्बल 17 पोलिस कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसंच ड्रग्जविरोधात पुढील काळात कायदेशीर कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचेही संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला, अंमली पदार्भविरोधी, ड्रग्जविरोधी कारवाई करताना, राज्यभरात 2024 मध्ये 44 हजार किलोची अमली पदार्थांची जप्ती करताना, 14 हजार 230 आरोपी अटक केली होती. 2025 मध्ये 56 हजार किलोची जप्ती आहे. यात 15 हजार 933 आरोपी अटक केले.

जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो नष्ट करण्याचे काम राज्य पोलिस (Police) दलांनी केलं आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अंमली पदार्थांच्या तस्करीत, विशेष करून ड्रग्जच्या तस्करीत सहभाग आढळलेल्या पोलिसांवर थेट बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 17 पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
राज्यातील गुन्हेगारीविरोधात कारवाई करताना, पोलिस दल सक्षम करण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. 2025 साली जवळपास 24 नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती केली. तसंच पोलिस दलामध्ये 24,230 पदं ही रिक्त आहेत. यापैकी जवळपास 16,607 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. गृहमंत्री म्हणून माझ्या कार्यकाळात 50 हजार पेक्षा जास्त पोलिसांची भरती राबवल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
MPSC च्या माध्यमातूनही PSI ची सर्वात मोठी संख्या भरण्याचं काम केलं. पोलिस दलासाठी जवळपास 12,952 घरांचं बांधकाम चाललेलं आहे आणि पोलिसांना स्वतःच्या घराकरता 2,487 कोटी रुपये घर बांधणी अग्रीम म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये वितरीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
मुंबई क्राईम ब्रांचने अमली पदार्थांच्या कारवाईत राज्य आणि राज्यबाहेर जाणून कारवाई केल्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधलं. घाटकोपर, सातारा, रेंज हिल्स पुणे, हिंजवडी पुणे, वाशी, नवी मुंबई, बेंगलोरमध्ये जाऊन यशस्वी कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.