Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ओम बिर्ला यांच्यानंतर विरोधकांचं पुढचं मोठं टार्गेट थेट महाभियोग आणणार, 193 खासदारांच्या सह्या...

ओम बिर्ला यांच्यानंतर विरोधकांचं पुढचं मोठं टार्गेट 
थेट महाभियोग आणणार, 193 खासदारांच्या सह्या...

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधकात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला आहे. त्यानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. विरोधकांकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच पदावरून हटविण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांकडून केली जात आहे. या प्रस्तावावर १९३ विरोधी खासदारांनी स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी लोकसभेतील एकूण १३० खासदार आणि राज्यसभेतील ६३ खासदारांनी नोटीसवर सही केल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
विरोधकांकडून शुक्रवारी किमान एका सभागृहात नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ही नोटीस लोकसभा की राज्यसभेत दिली जाणार, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. विरोधी पक्षातील एका नेत्याने सांगितले की, नोटीसवर सह्या करण्यासाठी खासदारांनी मोठा उत्साह दाखवला. प्रस्ताव आणण्यासाठी आवश्यक सदस्य संख्या पूर्ण झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्यासाठीचा प्रस्ताव लोकसभेत आणण्यासाठी किमान १०० खासदारांच्या तर राज्यसभेसाठी ५० खासदारांच्या सह्या आवश्यक आहे. हा निकष पूर्ण झाला आहे. त्यामुळे सुक्रवारी कोणत्याही एका सभागृहात नोटीस दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे या नोटिशीवर आम आदमी पक्षासह सर्व विरोधी पक्षांतील सदस्यांच्या सह्या आहेत.

विरोधकांनी नोटीस दिल्यास ही संसदेच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. सीईसीविरोधात प्रामुख्याने सात प्रमुख आरोप केल्याचे सांगितले जात आहे. पक्षपातीपणा, विरोधी पक्षांसोबत भेदभाव, निवडणुकीशी संबधित तक्रारींच्या चौकशीत अडथळे आणणे, मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदानापासून वंचित ठेवणे आदी आरोप विरोधकांनी केल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

दरम्यान, विरोधकांकडून यापूर्वी अनेकदा ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत. वोट चोरीचा मुद्दा मागीलवर्षी प्रचंड गाजला होता. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगाकडून भाजपला मदत केली जात असल्याचा थेट आरोप केला होता. त्याचप्रमाणे विरोधकांकडून मतदारयादी पुनर्पडताळणी मोहिमेवरही आक्षेप घेतला जात आहे. या मुद्द्यावरून सध्या विरोधक आणि निवडणूक आयोग आमनेसामने उभे ठाकले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.