Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य शासनाच्या परीक्षेच्या हॉल तिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो!

राज्य शासनाच्या परीक्षेच्या हॉल तिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो!

पटना : खरा पंचनामा 

बिहारमध्ये सरकारी भरती प्रक्रियेतील ढिसाळ कारभाराचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. रोहतास जिह्यातील एका उमदेवाराच्या हॉल तिकिटावर चक्क कुत्र्याचा फोटो छापून आला आहे. रितेश कुमार असे या उमेदवाराचे नाव असून त्याने दिवाणी न्यायालयातील शिपाई पदासाठी अर्ज केला होता.

परंतु हॉल तिकीट हातात पडल्यानंतर त्याला धक्का बसला. या हॉल तिकीटवर त्याच्या फोटोऐवजी कुत्र्याचा फोटो छापलेला त्याला दिसला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणावर टीका केली जात आहे.

रितेश कुमारने 2022 मध्ये दिवाणी न्यायालयात शिपाई पदासाठी अर्ज केला होता. तब्बल चार वर्षांनंतर म्हणजेच 2026 मध्ये या परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले. रितेशने इंटरनेटवरून आपले हॉल तिकीट डाऊनलोड केले. परंतु हॉल तिकीट पाहिल्यानंतर रितेशला मोठा धक्का बसला. प्रवेशपत्रावर रितेशचे नाव, पत्ता आणि अन्य शैक्षिणिक माहिती व्यवस्थित आणि अचूक होती. परंतु रितेशच्या फोटोऐवजी एका कुत्र्याचा पट्टो छापून आला होता. या पदासाठी परीक्षा 15 मार्चला होणार आहे. रितेश कुमारला सहरसा जिह्यात परीक्षा केंद्र आले आहे.

हॉल तिकिटावर कुत्र्याचा फोटो असल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल की नाही, अशी भीती रितेशला सतावत आहे. परीक्षेत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी रितेशने आधीच भरती मंडळ आणि संबंधित विभागाकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. तसेच नवीन दुरुस्त केलेले हॉल तिकीट मिळावे, अशी मागणी केली आहे. जर ही चूक वेळेत दुरुस्त झाली नाही तर मला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, यामुळे माझे करीअर धोक्यात येऊ शकते, असे रितेशने म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.