सुविधा नसतानाही महाराष्ट्र पोलीसांची क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा आदर्श ठेवून जिद्दीने लढा
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आवाहन
सांगलीत 2 री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 25-26 निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ
सांगली : खरा पंचनामा
कोणत्याही सोयी, सुविधा नसताना महाराष्ट्र पोलिसांनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत देदिप्यामान कामगिरी केली आहे. त्याचा आदर्श ठेवून अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी जिद्दीने लढून यश खेचून आणावे असे आवाहन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले.
सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित 2 री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 25-26 निवड चाचणी स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. महानिरीक्षक फुलारी म्हणाले, पूर्वी बॅडमिंटन आणि टेबल टेनीस स्पर्धेसाठी महाराष्ट्रात फारसे खेळाडू नव्हते. अन्य राज्यांच्या खेळाडूंच्या महाराष्ट्रातील खेळाडूंची संख्या नगण्य होती. अशा परिस्थितीत मी अनेकदा राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. पूर्वी विदर्भातील गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात खेळाडू तयार होत नव्हते. पण सांगलीतील निवड चाचणीसाठी गडचिरोली येथूनही खेळाडू सहभागी झाल्याचा विशेष आनंद आहे.
प्रास्ताविक करताना सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्याचे नियोजन बऱ्याच दिवसापासून सुरु होते. आता सांगलीत या स्पर्धा होत आहेत याचा आनंद आहे. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंची निवासाची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेतून दर्जेदार खेळाडूंची निवड होऊन महाराष्ट्राचे खेळाडू अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनीही सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत राज्यभरातून 168 पोलीस अधिकारी, अंमलदार, महिला सहभागी झाल्या आहेत. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, स्पर्धेसाठी विशेष सहाय्य करणारे पीएनजी ग्रुपचे सिद्धार्थ गाडगीळ, क्वॉलिटी पॉवर कुपवाडचे मॅनेजर संजोग म्हात्रे, ए.पी. बेकरी, सांगलीचे श्री. फिरोज, आमराई ऑफिसर क्लबचे सचिव बाबा गुंजाटे, सांगलीचे बॅडमिंटन कोच अजय मराठे, महाराष्ट्र पोलीस दलाचे सहायक क्रीडा अधिकारी एपीआय संतोष कांबळे, कोल्हापूर शहरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, सांगली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक किरण चौगले उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक गजानन सरगर, जोतिराम पाटील आरपीआय बाळू आलदर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सायबरच्या रुपाली बोबडे आदी या स्पर्धाचे संयोजन करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.