Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजाची विक्री, पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक : जयसिंगपूर येथील एकाचा समावेश दुचाकीसह 3.02 लाखांचा मुद्देमाल जप्त : कवठेमहांकाळ येथे एलसीबीची कारवाई

गांजाची विक्री, पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक : जयसिंगपूर येथील एकाचा समावेश 
दुचाकीसह 3.02 लाखांचा मुद्देमाल जप्त : कवठेमहांकाळ येथे एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ-थबडेवाडी रोडवर गांजा विक्रीसाठी थांबलेल्या एकाला तर त्याला गांजा पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर येथील एकाला अशी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन किलो गांजा, बुलेट असा 3.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.

इम्रान उस्मान सनदे (वय ३२, रा. इझुरेवाडी रोड, कारखान्याजवळ, विजयनगर, कवठेमहांकाळ), समीर इब्राहिम नकाशे (वय ३२, रा. ८ वी गल्ली, राजीव गांधीनगर, माळवाडी, जयसिंगपूर, जि. कोल्हापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा, पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक कवठेमहांकाळ येथे गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील अमोल ऐदाळे यांना एकजण थबडेवाडी फाट्यावर गांजा विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली. 

पथकाने तेथे जाऊन इम्रान सनदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ तीन किलो गांजा सापडला. त्याला अटक करून तो जप्त करण्यात आला. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून विक्रीसाठी गांजा आणल्याची कबुली दिली. नकाशे याला अंकली फाटा येथे अटक करण्यात आली.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक महादेव पोवार, अनिल ऐनापुरे, संजय पाटील, अमोल ऐदाळे, आमसिध्द खोत, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, सुनिल जाधव, रोहन घस्ते, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.