अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक?
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातला अटक करण्याच्या ३ दिवस आधी राज्यातील ३ आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती.
कॅप्टन खरात आणि आयएएस अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती. शिर्डीमधील ३ आयएएस अधिकारी कॅप्टन खरातला भेटल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती दिली. विनोद नावाच्या एका व्यक्तीने या आयएएस अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती आहे.
राज्यातील ते तीन आयएएस अधिकारी कोण होते? याचा एसआयटीमार्फत तपास करण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिर्डी परिसरात आरोपी कॅप्टन खरातचा विनोद नावाचा पंटर आहे. हा विनोद चौकशीच्या फेऱ्यात येणार का? हे पाहणे महत्वाचे राहिल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.