Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी

खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी

मुंबई : खरा पंचनामा 

नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सूपूर्त केला आहे.

या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे. खरात आणि त्याच्या कार्यालयातील ऑफिस बॉय नीरज जाधव यांच्या मुसक्या आवळल्यानंतर एसआयटीने आता या प्रकरणात राजकीय धागेदोरे काय आहे, हे पाहण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे SIT चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. लोंढे हा सिन्नरमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसायात सक्रिय होता. लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार असल्याचे प्रथमदर्शी दिसते.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनाम्या दिल्यानंतर विरोधी पक्ष त्यावर समाधानी नसून चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली.

'राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली अस त्यांना वाटत नाही, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.