Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खामेनेई यांच्या निधनानंतर 5 दिवसांनी भारताची पहिली प्रतिक्रियापरराष्ट्र सचिवांनी इराण दूतावासात नोंदवला शोकसंदेश

खामेनेई यांच्या निधनानंतर 5 दिवसांनी भारताची पहिली प्रतिक्रिया
परराष्ट्र सचिवांनी इराण दूतावासात नोंदवला शोकसंदेश

दिल्ली : खरा पंचनामा 

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी भारत सरकारने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गुरुवारी भारत सरकारच्या वतीने इराण दूतावासात जाऊन शोकनोंदवहीवर (कंडोलन्स बुक) स्वाक्षरी केली.

८६ वर्षीय अली खामेनेई हे १९८९ पासून इराणचे सर्वोच्च नेते होते. गेल्या शनिवारी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत त्यांचे निधन झाले.

मिस्री यांची ही भेट खामेनेई यांच्या निधनावर भारताची पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया मानली जात आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या नेत्यांशी दूरध्वनीवर संवाद साधला, मात्र खामेनेई यांच्या निधनावर त्यांनी अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही.

या मौनावरून सरकारवर विरोधकांकडून सतत टीका होत आहे. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येवर सरकारचे मौन म्हणजे "तटस्थता नव्हे, तर जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे," असे त्या म्हणाल्या. या मौनामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा आणि विश्वासार्हता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.