Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खरात प्रकरणात आणखी 70 महिलांचा पोलिसांना फोन, व्यथा ऐकून अधिकारी हादरले !

खरात प्रकरणात आणखी 70 महिलांचा पोलिसांना फोन, व्यथा ऐकून अधिकारी हादरले !

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून आता १० दिवस उलटले आहेत. त्याच्या अटकेनंतर त्याच्या काळ्या कृत्यांची अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्याने शोषण केलेल्या महिला, त्याने लुटलेले लोक आता समोर येत अशोक खरात विरोधात फिर्याद दाखल करत आहेत.

शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा अशोक खरात विरोधात दोन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका विवाहित महिलेच्या लैंगिक शोषणाचा आणि एका व्यावसायिकाच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. या नवीन गुन्ह्यांमुळे अशोक खरातवर आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

दरम्यान, आता आणखी ७० महिलांवर अशोक खरातने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर पोलिसांनी एक हेल्पलाईन नंबर जारी केला होता. खरातने शोषण केलं असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं. आता पोलिसांना फोनवर फोन येत आहेत. फोनवरून व्यक्तीकडून अशोक खरातच्या अत्याचाराचा आणि फुसवणुकीचा पाढा वाचला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच दिवसांत अशोक खरात याच्या विरोधात फोनद्वारे तब्बल १०० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. तक्रारदारांमध्ये 70 टक्के महिलांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात विरोधात एवढ्या मोठ्या संख्येनं फोनद्वारे तक्रारी प्राप्त होत असल्या तरी त्यांच्याकडून लेखी तक्रारी दाखल होत नाहीये. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने या महिला तक्रार देत नाहीत. मात्र एसआयटीचे अधिकारी तक्रारदारास सुरक्षिततेची हमी देत मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक खरात प्रकार केवळ लैंगिक शोषण आणि फसवणूक यापुरतं मर्यादीत नाहीये. आता भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. तो भारतात कमवलेला बेकायदेशीर पैसा परदेशात पाठवण्यासाठी हवालाचा वापर करत होता. त्याने दुबई पर्यंत पैशांची देवाण-घेवाण केल्याची माहिती समोर आली आहे. यात त्याचे अनेक बडे भक्त आणि मोठे अधिकारी त्याला मदत करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता असून SIT ला याबाबत सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.