Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या"महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

"रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या"
महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

नाशिक : खरा पंचनामा 

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर याच महिलांना अशोक खरातकडे पाठवायच्या, असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यादेखील नाशिकमध्ये होत्या. त्यांनीही पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांना अटक करा, कारण त्याच महिलांना तिथे पाठवत होत्या. त्यावेळी त्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या. पत्रिकेतील ग्रह तपासण्यासाठी चाकणकर महिलांना खरातकडे पाठवत होत्या. रोज एक महिलेचा व्हिडीओ बाहेर येतोय, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.

रुपाली ठोंबरे पाटील पुढे म्हणाल्या, पुण्यातील एका उद्योजकाचीही फसवणूक झालेली आहे. सध्या इतर महिलांचेच व्हिडीओ बाहेर येत आहेत. चाकणकर किंवा त्यांच्या कुटुंबातील व्हिडीओ बाहेर आणावेत. ज्या महिला माझ्याकडे येत आहेत, त्यांना मी तक्रार द्यायला सांगितलं आहे. मी कुणालाही फोर्स करणं योग्य नाही, महिलांची मानसिक तयारी होईल तेव्हा त्या तक्रारी करतील.

रुपाली ठोंबरे पुढे म्हणाल्या की, ज्या महिलांचे व्हिडीओ समोर आलेले आहेत त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडे व्हिडीओ आले. तृप्ती देसाई यांच्याकडे व्हिडीओ आधीच आलेले होते, मात्र तेव्हा एफआयआर झाला नाही. गुन्हा दाखल झाला असता तर १५० महिलांचे शोषण झाले नसते.. यात मोठी तोडपाणी झाली. यामध्ये रुपाली चाकणकर यांचाही सहभाग आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.