पाकिस्तानचा प्रमुख लष्करी तळ उद्ध्वस्त, मध्यरात्री मोठा हाहाःकार
दिल्ली : वृत्तसंस्था
इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. अमेरिका गेल्या काही दिवसांपासून इराणला सतत धमकावत होती. त्यामध्येच अखेर इराणवर मोठा हल्ला करण्यात आला. अनेक क्षेपणास्त्र इराणमध्ये टाकली जात आहेत.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. इराणकडून अमेरिकेचे लष्कर बेस असलेल्या देशांमध्ये थेट हल्ले करण्यात आली आणि अमेरिकेचे लष्कर बेसला टार्गेट करण्यात आले. एक दोन नव्हे तर तब्बल 8 देशांवर इराणने हल्ले केले. दुबई विमानतळही इराणच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळाले. तेहरानमध्ये असंख्य हवाई हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केली जात आहेत. इराणच्या अनेक मोठ्या शहरांचे नुकसान झाले. सध्या तणावाची स्थिती बघायला मिळत आहे. भारताकडून हे युद्ध थांबवण्याची विनंती करण्यात आली. चीनकडूनही युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, हे युद्ध अधिक भडकताना दिसत आहे.
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमुळे जवळपास 8 देशांवरही हल्ले केली जात आहेत. शिवाय इराण आणि इस्त्रायलही एकमेकांवर हल्ले करत आहेत. यादरम्यानच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही वाढल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच आता तालिबानने मोठा दावा केला. यासोबतच त्यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. पाकिस्तानला मोठा धक्का अफगाणिस्तानकडून देण्यात आला.
अफगाणिस्तानात सत्तेत असलेल्या अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानमधील अनेक प्रमुख लष्करी तळांवर यशस्वी हवाई हल्ले केले आहेत.
यासोबतच पाकिस्तानची झोप उडवणारा व्हिडीओही व्हायरल केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आमच्या हवाई दलाने रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेट्टा येथील 12 वीं कोर, खैबर पख्तूनख्वा आणि घेलानी लष्करी तळांना टार्गेट करत आम्ही हल्ला केला.
निवेदनात म्हटले आहे की, या तळांवर अचूक आणि समन्वित हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, अफगाणिस्तानच्या दाव्यावर पाकिस्तानकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. मात्र, अफगाणिस्तानकडून मोठा बदला पाकिस्तानचा घेण्यात आला. थेट त्यांच्या एअर बेसलाच पाकिस्तानने नुकसान पोहोचवल्याचे बघायला मिळत आहे. पाकिस्तानात मोठी खळबळ उडालीये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.