अजितदादांच्या विमान अपघातावर व्ही के सिंगचा धक्कादायक जबाब!
पुणे : खरा पंचनामा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात व्हीएसआर कंपनी आणि कंपनीचे मालक रोहित सिंगवर अनेक गंभीर आरोप करत हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा केला आहे.
त्यानंतर या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. यामध्ये त्यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर धक्कादायक जबाब दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अपघाताची जबाबदारी आपली नसल्यांच सांगितलं आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सीआयडीने पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी केली त्यामध्ये यामध्ये त्यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर धक्कादायक जबाब दिल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा. त्यांच्या या धक्कादायक उत्तरांमुळे त्यांच्या बेजबाबदार पणावर टीका केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने काल पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांनी चौकशीसाठी बोलवलं होतं मात्र यावेळी रोहित सिंगला शाही पाहुणचार देण्यात आला असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.