लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय, त्यावर आज चर्चा होणार आहे. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे.
अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, पश्चिम आशियातील युद्ध, इराणबद्दल सकारची भूमिका, रशियाकडून तेल खरेदी, पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या मुद्द्यांवरून संसदेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदनात उपस्थित राहण्यासाठी भाजप, काँग्रेस यांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यामुळे आज सभागृहात हा चर्चेचा मुख्य विषय आहे.
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करायचा असेल तर कमीत कमी ५० सदस्यांचा पाठिंबा लागतो. अविश्वास प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यावर चर्चा करून मतदान केले जात. पण ५० सदस्यांनी पाठिंबा दिला नाही तर प्रस्ताव अमान्य केला जातो. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे.
मोहम्मद जावेद, के. सुरेश आणि मल्लू रवी या काँग्रेस सदस्यांकडून लोकसभेत सूचना मांडली जाईल. अध्यक्षांचे सभागृहातील वर्तन, विरोधकांना बोलू न देणे, महिला खासदारांवर आरोप. या कारणांमुळे विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडला जात आहे. माजी पंतप्रधानांविरुद्ध पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना अक्ष्यक्षांनी फटकारले नाही, असा आरोपही काँग्रेसने केला.
ओम बिर्ला सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाचे उघडपणे समर्थन करतात आणि त्यांच्या या सर्व कृती या सभागृहाच्या कामकाजासाठी अयोग्य आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव विरोधकांकडून आज मांडला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.