Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्रकाराच्या हत्येच्या आरोपातून बाबा राम रहीमची निर्दोष मुक्तता न्यायालयाने तिघांना ठरवले दोषी

पत्रकाराच्या हत्येच्या आरोपातून बाबा राम रहीमची निर्दोष मुक्तता न्यायालयाने तिघांना ठरवले दोषी

अमृतसर : खरा पंचनामा 

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येच्या आरोपात जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेले गुरमित राम रहीम यांना पंजाब हरियाणा हायकोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. तर, तीन आरोपी कुलदीप सिंह, निर्मल सिंह, कृश्ण लाल यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

17 जानेवारी 2019 मध्ये डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना दोषी ठरवून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या विरोधात हाय कोर्टात धाव घेतली होती.

आज झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने राम रहिम यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या विरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे.

दरम्यान, हत्येच्या आरोपातून राम रहिम यांची सुटका झाली असली तरी साध्वींच्या यौन शोषणाच्या आरोपात त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना अजुनही तुरुंगातच राहावे लागणार आहे.

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी बाबा राम रहिम आणि त्यांच्या सच्चा डेरा बाबत काही बातम्या आपल्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या, त्यानंतर 2022 मध्ये गोळीमारून त्यांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होती. या प्रकरणाचे धागेदोरे बाबा राम रहीम प्रमुख आरोपी असल्याचे सांगत सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना शिक्षा देखील सुनावली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.