Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्रायली हल्ल्यांनंतर तेहरान विषारी धुराने काळवंडले; 'अॅसिड रेन'ची भीती

इस्रायली हल्ल्यांनंतर तेहरान विषारी धुराने काळवंडले; 'अॅसिड रेन'ची भीती

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

इराणवर अमेरिका आणि इस्त्रायकडून होणारे हल्ले तीव्र झाले आहेत. इस्त्रायलने तेहरानमधील तेल साठ्यांवर हवाई हल्ला केल्यामुळे इराणमध्ये नव्या संकटाने तोंड वर काढले आहे.

तेल साठ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले असून, सर्वत्र विषारी धुराची चादर दिसून येत आहे. काही ठिकाणी अॅसिड रेनचा (आम्ल पाऊस) वर्षाव झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. इस्रायलने शनिवारी रात्री तेहरान आणि अल्बोर्ड्समधील अनेक तेल साठ्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.

इस्त्रायलने इराणमधील तेल साठ्यांना लक्ष्य केल्यानंतर मोठा स्फोट झाल्यानंतर आगीच्या ज्वाळांचे प्रचंड निदर्शनास पडले. सासह धुरांचे लोट हवेत पसरले आहेत. दाट धुक्यासारखे विषारी धूराचे साम्राज्य सध्या राजधानी तेहरानमध्ये पाहायला मिळत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. शनिवारी रात्री हे चित्र तेहरानमध्ये दिसून आले यामुळे येथील नागरिक धास्तावले आहेत.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. वातावरणात हायड्रोकार्बन आणि धूर अधिक असल्याने नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. शनिवारी काही ठिकाणी आम्ल पावसामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्तात म्हटले आहे.

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, २० जखमी झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे अनेकांना घशाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ असे त्रास होऊ लागल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

इराणमधील पर्यावरणसंबधित संस्थांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. विषारी धुरामुळे नागरिकांना त्वचा आणि फुफुसाचे आजार होण्याचा धोका आहे. पावसाची शक्यता दिसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच, नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.