Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

व्ही. के. सिंगकडून पिंकी माळीच्या कुटुंबीयांना धमकी?

व्ही. के. सिंगकडून पिंकी माळीच्या कुटुंबीयांना धमकी?

मुंबई : खरा पंचनामा 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरुन भूमिका मांडत व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

त्यांच्या दाव्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सहमती दर्शवली आहे. ते देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना आणि सोशल मीडियावर पोस्ट करताना हा दावा सातत्याने करताना दिसत आहेत. आता त्यांनी एक्सवरील अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

विमान अपघातात पायलट पिंकी माळी या तरुणीला देखील आपला जीव गमावला लागला. या दुर्देवी घटनेचा मोठा आघात माळी कुटुंबावर झाला आहे. पिंकीची आई रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या आईची अमोल मिटकरींनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पिंकी यांचे वडील आणि भाऊ देखील उपस्थित असल्याचे मिटकरींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

या ट्वीटमध्ये त्यांनी व्हिएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये एक मोठी शंका उपस्थित केली आहे. हे प्रकरण वरवर जस दिसतंय तस सोप नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले. ज्यात पायलट ने "अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया" अशी वापरलेली भाषा ही VSR चे अंडरवर्ल्ड शी संबंध तर नाही ना? अशी शंका उपस्थित करते. एक मात्र खरंय हे प्रकरण वरवर जस दिसतय तस सोप नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.