Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार विमान अपघातप्रकरणी कर्नाटकातील गुन्हा महाराष्ट्रात वर्ग

अजित पवार विमान अपघातप्रकरणी कर्नाटकातील गुन्हा महाराष्ट्रात वर्ग

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

हा मुद्दा त्यांनी चांगला लावून धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल केला जावा यासाठी ते प्रतत्न करत होते. अखेर सोमवारी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलीस दलाची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असल्याचे म्हटले आहे. 'अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. आता परीक्षा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची... या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला साजेसा सखोल तपास महाराष्ट्र पोलीस या गुन्ह्याचा करतील आणि राज्य सरकारही त्यासाठी सहकार्य करेल, ही अपेक्षा!'

रोहित पवार यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत एफआयआर दाखल झाल्याबद्दल माहिती दिली होती. तसेच अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली शक्ती कितीही मोठी अली तरी त्यांना शिक्षा व्हावी यासाठी लढू असा निर्धार देखील रोहित पवारांनी व्यक्त केला होता. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की 'अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल (सोमवार, दि. २३ मार्च) कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने एफआयआर दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला, याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या एफआयआरचा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू...! हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू ! #महाराष्ट्र_धर्माने आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणुकीप्रमाणे काम करत राहू..!'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.