अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना मोठा धक्का; पोलिसांचे मोठे पाऊल
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याचे एकामागून एक धक्कादायक प्रकार समोर येत असतानाच आता या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. खरातच्या 'शिवनिका ट्रस्ट' मधील सर्व सदस्यांची चौकशी करण्याचा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतला आहे.
या ट्रस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्यामुळे त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देत स्पष्ट केले की, आरोपीच्या संपर्कात असलेल्या सर्व राजकीय व्यक्तींचीही चौकशी केली जाईल.
अशोक खरात विरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर अनेक गंभीर आरोप समोर येऊ लागले. खरातसोबतचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या वाढत्या दबावामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
सध्या या प्रकरणात अशोक खरात विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल असून, हे सर्व गंभीर स्वरूपाचे आहेत. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीतही वाढ केली आहे.
या पार्श्वभूमीवर आता ट्रस्टमधील सर्व सदस्यांची चौकशी होणार असल्याने प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.