मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित?
झिरवाळ यांनी मुख्यमंत्री यांची का घेतली भेट?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीतील असून काँग्रेसने झिरवाळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे.
दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती.
या चित्रफीत प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना होती. मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंत्री पदासाठी काही इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची पक्षांमध्ये चर्चा आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होणे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. झिरवाळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या संदर्भात झिरवाळ यांच्या स्वीय सहायकांशी संपर्क साधला असता साहेबांना याप्रकरणी काही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.