सातारा SP तुषार दोशी निलंबन; नीलम गोहेंच्या निर्देशानंतर निर्णय घेताना राम शिंदेंची अडचण, तज्ज्ञांचा सल्ला घेणार
मुंबई : खरा पंचनामा
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या मुद्द्यावर विधान परिषदेत मोठा पेच निर्माण झाला आहे. उपसभापती नीलम गोऱ्ह यांनी दिलेल्या निर्देशांनंतर सभापती राम शिंदे यांच्यासमोर निर्णय देताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वाद टाळण्यासाठी आणि निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये यासाठी सभापती राम शिंदे यांनी कायदेशीर आणि संविधानिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय देण्याचे संकेत दिले आहेत.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान महायुतीतील शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. या प्रश्नी विधान परिषदेमध्ये दोन्ही मंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या आमदारांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी केली. त्यावेळी तालिका अध्यक्षा असलेल्या नीलम गोऱ्ह यांनी सातारा पोलीस अधीक्षकांसह दोन पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. या निर्देशांनंतर सभापती राम शिंदे यांनी हा निर्णय राखून ठेवला होता.
अधिवेशन संपत असताना हा मुद्दा पुन्हा एकदा विधान परिषदेत चर्चेला आला. सभापती राम शिंदे यांनी रुलिंग देताना उपसभापतींच्या कार्यक्षेत्राचा विचार करून चौकशी केल्यानंतरच निर्णय घ्यायला हवा होता, असे नमूद केले. यावर मंत्री शंभूराजे देसाई आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत, निलंबनाचा निर्णय घेतला आहे की नाही? यावर स्पष्टता मागितली. त्यावर सभापतींनी थेट उत्तर देणे टाळल्यानं सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सदस्यांकडून याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत राहिल्याने अखेर सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणी कायदेशीर आणि संविधानिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय दिला जाईल, असं स्पष्ट केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.