बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
पिस्तूलसह तीन काडतूसे जप्त : सांगली एलसीबीची उमदीत कारवाई
सांगली : खरा पंचनामा
संख-अंकलगी रस्त्यावर तलावाजवळ बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, तीन काडतूसे जप्त करण्यात आला. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
संभाजी हणमंत नलवडे (वय ३३, रा. एच पी गॅस गोडावून जवळ, संख, ता. जत) असे अटक केलेल्याचे नावे आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते. पथक जत तालुक्यात गस्त घालत असताना पथकातील अमोल ऐदाळे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संख-अंकलगी रस्त्यावर असलेल्या तलावाजवळ बसल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने तेथे जाऊन नलवडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतूसे सापडली. त्याला अटक करून पिस्तूल, काडतूसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, आमसिध्द खोत, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अनंत कुडाळकर, शिवाजी सिद, रोहन घस्ते, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.