सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आणखी कडक करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संभाजी पुरीगोसावी
मुंबई : खरा पंचनामा
सोशल मीडियाचा वापर करून व्यक्तींची प्रतिमा मिलिन करणाऱ्या प्रवृत्तींना आता लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अशा प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई निश्चित करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत केली आहे.
यापुढे जर कोणी सोशल मीडियाचा मीडियाच्या माध्यमांतून एखाद्याची बदनामी करत असेल तर त्याची खैर केली जाणार नाही. सायबर गुन्ह्याशी संबंधित प्रश्नला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सोशल मीडियाचा दूरउपयोग करून खोटी माहिती आणि अफवा पसरवण्याचे प्रमाण चांगले वाढले आहे. ही समिती अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अभ्यास करेल आणि अशा प्रकरणांमध्ये प्रभावी कारवाईसाठी आवश्यक ते बदल सुचवेल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणाचीही बदनामी होऊ नये यासाठी समिती मार्गदर्शक तत्वे तयार करेल. आता पोलीस महासंचालकांच्या समितीला या मुद्द्यांवरही विचार करण्यास सांगितले जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.