मंत्री झिरवाळांच्या अश्लील चित्रफितीचा उलगडा; बनवणारा तृतीयपंथी खंडणीखोर
भावाने केला भांडाफोड, तृतीयपंथी शिंदे शिवसेनेची पदाधिकारी
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची तृतीयपंथीयसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत असताना ते आणि त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही या प्रकरणी मौन बाळगून आहेत. त्यामुळे या चित्रफीत प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
मंत्री झिरवाळ यांनी संपर्क साधूनही याप्रकरणी कोणताही खुलासा केला नाही तसेच पोलिसांत याची तक्रार देखील दिलेली नाही. मंत्री झिरवाळ यांच्यासोबतची १० मिनीटांची आक्षेपार्ह चित्रफिती दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर झिरवाळ यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती.
झिरवाळ यांचे मंत्रीपद राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्याला हवे आहे, त्यामुळे त्यांना निशाणा बनवण्यासाठी चित्रफीत बनवली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनागोंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. झिरवाळ यांच्यासोबतची तृतीयपंथी अॅड. पवन यादव मुंबईतील नामांकीत असून ती दिंडोशी व बोरीवली न्यायालयात काही काळ वकिली करत होती.
पवन यादवने अनेक महत्वाच्या व्यक्तींना अश्लील चित्रफीती काढून खंडणी उकळली आहे. पवनचा खंडणी उकळण्याचा अनेक वर्षे उद्योग सुरु आहे, असा आरोप तिचा भाऊ रवी यादव याने केला आहे. पवन यादव महिला प्रदेश काँग्रेसच्या तृतीयपंथी सेलची काही काळ प्रमुख होती. २०२२ मध्ये तिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, असे काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सवालाखे यांनी सांगितले.
पवन यादवचे अनेक मंत्री व आमदारांसोबतची छायाचित्रे समाज माध्यमांवर आता प्रसारीत होत आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना खासदार रविंद्र वायकर, काँग्रेसचे नाना पटोले, मंत्री संजय शिरसाट, आमदार हिरामण खोसकर या नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे आपण विधी सल्लागार आहोत, अशी पवन ओळख सांगते. देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील महिला तृतीयपंथी वकील असल्याचे पवनने घोषित केलेले आहे. काही काळ पवनने सारथी फाऊंडेशनसोबत काम केले. पवनला महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी विधान परिषद आमदार बनण्याची मनिषा आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शयनकक्षात हे अश्लील चित्रीकरण झालेले आहे. मंत्री झिरवाळ यांच्या बेडवर सदर तृतीयपंथी महिला बसली आहे. दुसरी व्यक्ती त्याचे चित्रीकरण करते आहे. झिरवाळ झोपेत असताना तृतीयपंथी त्यांच्या शेजारी झोपते आणि दुसरी व्यक्ती चित्रफीत बनवते आहे. चित्रफीत सात महिन्यापूर्वीची असून खंडणीसाठी हा प्रकार केलेला दिसतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.