युद्धाच्या झळा आता बिअर बॉटलपर्यंत !
किमती वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली : खरा पंचनामा
जगात युद्ध पेटलं आहे. या युद्धाच्या झळा भारतातही पोहोचताय. कारण उन्हाळ्यात जास्त मागणी असणाऱ्या बिअरच्या किंमती आता वाढू शकतात. ज्यामुळे बिअर प्रेमींच्या खिशावर भार पडू शकतो. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट बिअर बॉटल आणि कॅनपर्यंत पोहोचलाय. युद्धामुळे लॉजिस्टिक्स आणि पॅकेजिंगचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलाय.
याच कारणामुळे बिअरच्या किंमतीत वाढ होऊ शकते. हे संकट फक्त बिअर बॉटलपर्यंत मर्यादित नाही. तर प्लास्टिकच्या बॉटल आणि कॅपचा खर्च वाढल्याने बाटलीबंद पाणी आणि केचपच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
इरान युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. यासह अॅल्युमिनियमच्या पुरवठ्यावरही परिणाम झालाय. याच कारणामुळे काचेच्या बॉटलचा खर्च वाढतोय. यासोबतच कॅन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालही भेटत नाहीये. याच कारणामुळे बिअर तयार करणाऱ्या कंपन्यांनी इशारा दिलाय की, परिस्थिती लवकर सुधारली नाही तर किंमती या वाढवल्या जातील. हेनेकेन (Heineken), बडवायजर (AB InBev) आणि कार्ल्सबर्ग (Carlsberg) सारख्या दिग्गज कंपन्यांसह बीरा 91 आणि सिम्बासारक्या घरगुती ब्रांड्सवरही युद्धाचा परिणाम स्पष्ट दिसतोय.
नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. भारत देश आपल्या गरजेपैकी सुमारे 40% वायू कतारकडून आणतो. इरानद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे कतारच्या गॅस उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला. सोबतच हार्मुज स्ट्रेटच्याही आंशिकरित्या बंद झाल्याने भारतात गॅसचा पुरवठा मर्यादित झालाय. गॅसच्या कमतरतरेचा थेट परिणाम बिअरच्या बॉटल आणि कॅन तयार करणाऱ्या कंपन्यांवर झालाय. विशेषज्ञ मानतात की, हे ऊर्जा संकट आणि समुद्री मार्गामध्ये अडथळे अशीच राहिली तर उन्हाळ्याच्या पीक सिझनमध्ये बिअरचा स्टॉक मिळणं कठीण होईल.
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, पॅकेजिंग साहित्याच्या किंमतीनी ब्रुअर्सचा नफा कमी केलाय. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार, ग्लासच्या बॉटलची किंमत जवळपास 20% वाढलाय. बिअर पॅक करणाऱ्या पेपर कार्टनच्या किंमती आता दुप्पट झाल्या आहेत. लेबल, टेप आणि इतर आवश्यक साहित्याच्या खर्चातही वाढ झालीये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.