मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची बारामतीला बदली!
बारामती : खरा पंचनामा
बारामती येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मिरज येथील उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भातील शासकीय आदेश नुकताच जारी झाला असून उत्तम दिघे यांना तात्काळ बारामतीचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत.
वैभव नावडकर यांनी बारामतीत उपविभागीय अधिकारी म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले होते. नियमानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उत्तम दिघे यांना तात्काळ बारामतीत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, वैभव नावडकर यांची पुढील नियुक्ती अद्याप निश्चित झालेली नसून येत्या काही दिवसांत त्यासंदर्भातील आदेश जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.