Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रसाद खाताच महिला व्हायच्या बेभान ! त्या औषधाचं गूढ उलगडलं?

प्रसाद खाताच महिला व्हायच्या बेभान ! 
त्या औषधाचं गूढ उलगडलं? 

नाशिक : खरा पंचनामा 

स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. काही महिलांवर तर बलात्कार देखील केला.

लिंगपिसाट अशोक खरातच्या काळा कारनाम्यांचे जवळपास 56 व्हिडीओ समोर आले. तसेच त्याच्याविरोधात 11 तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या लैंगिक शोषण प्रकरणातील धक्कादायक तपास एसआयटी (SIT) च्या हाती आहे. खरातच्या पाशवी कृत्यांविषयी एक एक करत धक्कादायक माहिती उघडकीस येत असून, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने वापरलेल्या 'गूढ औषधा'ची माहिती समोर येऊ लागली आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या केबिनमध्ये येणाऱ्या महिलांना एक विशेष प्रकारचे गूढ औषध देत असे. हे औषध खारट किंवा कडवट चवीचे असल्याचे समोर आले आहे. तसेच तो त्यासोबत विशेष पेढे खायला लावत असे. या पदार्थांचे सेवन केल्यानंतर महिलांना काही वेळातच मळमळणे, डोके गरगरणे, डोके जड होणे असे प्रकार सुरू होत असत.

अर्धवट बेशुद्ध किंवा गुंगीच्या अवस्थेत असलेल्या महिलांवर खरात केबिनमधील दिवे बंद करून लैंगिक अत्याचार करत असे. या 'प्रसादा'च्या प्रभावामुळे पीडित महिलांना त्याच्या सूचनांचे पालन करण्यास भाग पडत असे, असा एसआयटीचा दावा आहे.

या प्रकरणातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे खरात महिलांना दिलेल्या त्या खारट द्रवात आणि पेढ्यांमध्ये नेमके कोणते रसायन किंवा घटक मिसळले होते? हे द्रव आणि पेढे कोणत्या प्रकारची गुंगी आणत होते? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात तपास यंत्रणेला याबाबत कोणतीही मदत करत नाही. या गूढ औषधांबद्दल तो काहीच सांगत नसल्याने, एसआयटीने त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे. एसआयटी आता या 'विषारी' पेढ्यांचा आणि संशयित द्रव पदार्थाचा खरा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत या गूढ औषधांचे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

काल अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपीला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. आता खरात प्रकरणात नवी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.