Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप जैन प्रकोष्ठाच्या पुढाकारातून सेवा शिबिर उत्साहात

भाजप जैन प्रकोष्ठाच्या पुढाकारातून सेवा शिबिर उत्साहात

सांगली : खरा पंचनामा 

ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीर जयंती निमित्त सांगली येथे "योजना साक्षरता शिबिर व सेवा सुविधा शिबिर" उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
हे शिबिर श्री पार्श्वनाथ जैन मंदिर, पार्श्वनाथ नगर (लक्ष्मी नगर), कुपवाड रोड, सांगली तसेच श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदिर, गाव भाग, सांगली या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व परिसरातील अनेक नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. या शिबिराचे नियोजन योजना प्रमुख विजय वरुडकर यांनी केले.

शिबिरामध्ये आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, उद्यम आधार नोंदणी, मतदान नोंदणी, अपंग प्रमाणपत्र, फार्मर आयडी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.

जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख प्रशांत गोंडाजे, भाजप जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

तसेच गावभाग येथील शिबिरावेळी अजित पाटील, श्रेयांश पाटील, शांतिनाथ कर्वे, बाबुराव पाटील व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्श्वनाथ नगर येथील शिबिरावेळी महावीर खोत, अमित चिंचवडे व बाहुबली देसाई, अश्विनी पाटील, संजय पाटील उपस्थित होते

या शिबिरास भाजप जैन प्रकोष्ठ, वीर सेवादल, महिला मंडळ तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या शिबिरामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचली असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.