वाळव्यातील गुंडाच्या खुनप्रकरणी महिलेसह तिघांना अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाळवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खुनप्रकरणी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आईला त्रास देत असल्याच्या कारणावरून महिलेसह तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राने खून केल्याची कबुली दिली आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रथमेश ऊर्फ बबलू आमसिध्द कोळी (वय,२१), अभिजीत ऊर्फ सोन्या बजरंग परीट (वय २४), राजश्री आमसिध्द कोळी (वय ४६, तिघेही रा. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय ३०) याचा वाळवा येथे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते.
पथक त्यांचा शोध घेत असताना पथकातील संकेत कानडे यांना हा खून कोळी मायलेकासह परीट याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कोळी याने संदेश ऊर्फ साहिल कदम हा माझी आई राजश्री कोळी हिला त्रास देत होता. त्यामुळे आमचेत वारंवार वादा-वादी होत होत्या. काल मी, माझा मित्र अभिजीत परीट, आई राजश्री कोळी असे घरी असताना मयत संदेश घरी आला. त्यावेळी आमचेत पूर्वीच्या कारणावरुन भांडणे झाली त्यावेळी मी, मित्र अभिजीत परीट आणि आई राजश्री कोळी यांनी मिळून मयत संदेश यास दगड व कळकाचे काठीने तोंडावर मारुन जखमी करुन त्याचा खून केला असल्याची कबूली दिली. त्यानंतर तिघांना अटक करून आष्टा पोलिसांच्या ताब्यात दिले.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, संदीप गुरव, अतुल माने, अरुण पाटील, उदयसिंह माळी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, सूरज थोरात, अभिजीत माळकर, सुशांत चिले आष्टा पोलीस ठाण्याचे अशोक जाधव, सागर हांडे, अमोल शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे अजय बेंद्रे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.