Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार!

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार!

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात मराठी न शिकवणाऱ्या शाळांची आणि संस्थाची मान्यता आता रद्द होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवणं अनिर्वाय आहे असे असताना देखील अनेक शाळांमध्ये मराठी शिकवले जात नाही.

त्यामुळे आता या शाळांविरोधात कारवाई होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना सांगितले की, 'ज्या माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जात नाही अशा तक्रारी आल्या तर तात्काळ त्याची चौकशी करू. चौकशीमध्ये आढळून आले की त्याठिकाणी मराठी शिकवली जात नाही. तर त्यांना तशी समज दिली जाईल.

ऐवढे करूनही जर कोणतीही शाळा मराठी भाषा शिकवणं याचे पालन करत नसेल तर त्या शाळा आणि संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल.' मुंबईतील अनेक इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवले जात नसल्याचा मुद्दा शिवसेना युबीटीचे आमदार हारूण खान यांनी उपस्थित केला होता. यावर चर्चा करत असताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.