Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास करणार आयपीएस लेडी सिंघम !

कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास करणार आयपीएस लेडी सिंघम !

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ, राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय असणारा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काल (बुधवारी) त्याला अटक करण्यात आली आहे. तपासात मोठे मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मंत्रतंत्र, दैवी शक्ती यांच्या आडून अनेक महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप खरात याच्यावर आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. विरोधकांनी हे प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.

खरात प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या तपासाची एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी सातपुते यांनी सातारा, सोलापूरचे पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे. सातपुते यांच्याकडे फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचाही तपास देण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.