Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंदिरातून चप्पल चोरी झाल्याने तहसीलदारांनी लिहिले थेट 'एसपी'ना पत्र!

मंदिरातून चप्पल चोरी झाल्याने तहसीलदारांनी लिहिले थेट 'एसपी'ना पत्र!

इंदोर : खरा पंचनामा 

अनेक मंदिरांमध्ये चप्पल चोरीच्या घटना सातत्याने होत असतात. त्याच्या तक्रारीही होतात. पण चोरीच्या घटना थांबत नाहीत. अशाच एका मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तहसीलदारांचीच चप्पल चोरीला गेली. त्यांनी मंदिर परिसरात चप्पल शोधली, पण सापडली नाही. अखेर सीसीटीव्हीतून त्यांनी चोर शोधला. पण इगो हर्ट झालेल्या तहसीलदारांनी याचा मोठा मुद्दा करत थेट पोलीस अधिक्षकांनाच पत्र धाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील ही घटना आहे. तेथील बगुलामुखी मंदिरात बडागावचे नायब तहसीलदार अरुण चंद्रवंशी दर्शनासाठी गेले होते. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपली चप्पल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळपास तासभर चप्पल शोधली. तलाठ्यासह इतर कर्मचाऱ्यांना कामाला लावले. पण चप्पल सापडली नाही.

चप्पल न सापडल्याने अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करून तो मुद्दा तिथेच सोडून देतात. पण तहसीलदारांनी हे प्रकरण हलक्यात घेतले नाही. इगो हर्ट झालेल्या तहसीलदारांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यामध्ये चप्पल चोर सापडला. मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडले. चोराने कबुलीही दिली.

तहसीलदार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी हे प्रकरण थेट पोलीस अधिक्षकांपर्यंत नेले. एसपींना पत्र पाठवून त्यांनी झालेली घटना आणि अशाप्रकारच्या इतर घटनांचा संदर्भ देत संबंधित चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कोणत्या कलमांनुसार कारवाई करायची, हेही त्यात नमूद केले. तहसीलदारांचे हे पत्र सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहे.

तहसीलदारांच्या चप्पल चोरीच्या किस्स्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांनी पत्रात चप्पलांसोबतच मंदिरातील सामान चोरी होत असल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे श्रध्दाळूच्या भावना दुखवल्या जात आहेत. चप्पल शोधण्यासाठी मला एक तास त्रास झाला. तलाठ्यांनी चप्पल शोधूनही सापडली नाही. त्यामुळे आरोपीवर भारतीय नागरीक सुरक्षा कलम १७०, १२६ अंतर्गत कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.