Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग !" महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा

"बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग !" 
महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातचा पोलिसांसमोर अजब दावा

नाशिक : खरा पंचनामा 

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी (SIT) कडून कसून चौकशी सुरू आहे.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी खरात आता 'विधी' आणि 'अध्यात्म' या नावाखाली केलेल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.

चौकशीदरम्यान खरातने पोलिसांसमोर अत्यंत अजब दावे केले आहेत. "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले आहेत," अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. आता आपण यापुढे आपल्या मेंदूचेच ऐकणार असल्याचे त्याने म्हटले.

भोंदूबाबा अशोक खरात याने १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशोक खरात याने विधीच्या नावाखाली, महिलांच्या मनात भीती घालून, धमकी देत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले असल्याचा आरोप आहे. पोलीस चौकशीत मात्र, अशोक खरात याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्याची माहिती आहे. महिलांसोबत केलेले कृत्य हा विधीचाच एक भाग होता आणि आपण कुणावरही बळजबरी केली नाही, असा दावा त्याने केला आहे.

केवळ लैंगिक शोषणच नाही, तर खरातने यातून मोठी आर्थिक माया जमवल्याचेही समोर येत आहे. तपासाचा भाग म्हणून खरातच्या 'शिवानिका' संस्थेचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. याशिवाय, खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर राज्यभरातील जमिनी, घरे आणि इतर मालमत्ता तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.