Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एलसीबीत अधिकारी नियुक्तीत नियम पायदळी, थेट राष्ट्रपतींपर्यंत गेली तक्रार!

एलसीबीत अधिकारी नियुक्तीत नियम पायदळी, थेट राष्ट्रपतींपर्यंत गेली तक्रार!

नागपूर : खरा पंचनामा 

स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करताना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सरकारी आदेशाची पायमल्ली करत मनमानी केल्याची तक्रार मानवाधिकार सेवा संघटनने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे.

मानवाधिकार सेवा संघटनचे माजी अध्यक्ष संजय लोहितकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करताना सरकारने किमान तीन वर्षांचा अनुभव गृहीत धरावा असा निर्णय घेतला होता. त्यासाठी सरकारने २००९ आणि २०२५ ला शासकीय अध्यादेश जारी केला होता. सोबतच संबंधित व्यक्तीला २ पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून सेवा दिलेली असावी, असेही ठरवले होते. स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक म्हणून नियुक्ती होणाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसावे, असेही स्पष्ट दिशा निर्देश होते.

नागपूर ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे हे जानेवारी २०२६ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सरकारी अध्यादेशानुसार ज्यांना पोलिस निरीक्षक म्हणून ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि ज्यांनी २ वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून अ श्रेणी ठाण्यात सेवा दिली आहे, अशा पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करणे अपेक्षित होते.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शासकीय अध्यादेश पायदळी तुडवून जेमतेम ७ महिने पोलिस निरीक्षक पदाचा अनुभव असलेले अंकुश माने यांची स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती केली.

पोलीस अधिक्षकांची ही मनमानी शासकीय अध्यादेशाची पायमल्ली आहे. नागपुर ग्रामीण पोलीस दलात अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदासाठी पात्र असताना त्यांना डावलून, त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अंकुश माने यांची नियुक्ती केल्याने असंतोष खदखदत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस, पोलीस महासंचालक दाते यांनी याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. सोबतच तत्काळ माने यांची उचलबांगडी करावी आणि या जागी पात्र व अनुभवी पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करावी, असे साकडे मानवाधिकार सेवा संघटनने लक्ष वेधले आहे.

लोहितकर यांनी या तक्रारीची प्रत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल विष्णू देव वर्मा, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांना देखील पाठवली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.