Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरात प्रकरण; IPS सातपुतेंनी जारी केले 2 मोबाईल क्रमांक अन् 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे...

अशोक खरात प्रकरण; IPS सातपुतेंनी जारी केले 2 मोबाईल क्रमांक अन् 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे...

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकमधील नराधम अशोक खरात याचे नवे कारनामे दररोज समोर येत आहेत. अनेक महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहे.

SIT च्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते या आहेत. आज त्यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच नागरिकांना आवाहन केले आहे. या गुन्ह्यांविषयी उपयुक्त माहिती आपल्याकडे असल्यास पथकाला देण्यात यावी. तसेच या आरोपीने आपल्या बाबतचा काही अपराध केला असल्यास कृपया आम्हाला संपर्क करावा. आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

सातपुते यांनी तीन अधिकाऱ्यांच्या नावांसह दोन मोबाईल क्रमांकही जारी केले आहेत. अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांचा समावेश आहे. तर ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ हे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. या क्रमांकावर संपर्क साधून खरात प्रकरणी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.