Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन"नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

"महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन"
नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

परळी : खरा पंचनामा 

मागच्या वर्षभरापासून गाजत असलेल्या महादेव मुंडे प्रकणात धक्कादायक दावा पुढे येत आहे. या प्रकरणातल्या संशयित आरोपींची काही दिवसांपूर्वी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅम्पिंग करण्यात आलेली होती. यातील आरोपींनी धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केला आहे. नार्को टेस्टचा रिपोर्ट पोलिस जाणीवपूर्वक दडवून ठेवत असल्याचंही फड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे परळीतील नेते राजाभाऊ फड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. फड म्हणाले की, महादेव मुंडे यांचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच झाल्याचं नार्को टेस्टमध्ये उघड झाल्याची आमच्याकडे माहिती आहे. मात्र पोलिस नार्को टेस्टचे रिपोर्ट उघड करीत नाहीत, त्याचं कारण स्थानिक आमदाराचा दबाव. तपासाचा भाग असल्याचं कारण पोलिसांकडून सांगितलं जातंय. मात्र हा तपास किती दिवस चालणार? हा प्रश्नच आहे.

राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेंवर कलम १२० ब नुसार आरोपी करण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंनी परळीतल्या १० लोकांना संपवल्याचा धक्कादायक आरोप फड यांनी केला. "महादेव मुंडें हत्या प्रकरणाचा तपास तेव्हाच योग्य पद्धतीने झाला असता तर पुढच्या काळात बापू आंधळे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्या नसत्या. मात्र महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरुन फोन गेला आणि तपास थांबला." असाही आरोप राजाभाऊ फड यांनी केला आहे.

"महादेव मुंडेंचा खून होऊन एवढा काळ लोटला तरीही आरोपींना अटक झालेली नाही. आता २० मार्चपर्यंत खऱ्या आरोपींना अटक केली नाही आणि तपास पारदर्शकपणे झाला नाही तर तीव्र आंदोलन करु", असा इशारा राजाभाऊ फड यांनी दिलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.