Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

CID चौकशी की VIP पाहुणचार? अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावरून रोहित पवारांचा संताप

CID चौकशी की VIP पाहुणचार? 
अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावरून रोहित पवारांचा संताप

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणावरून राज्य यंत्रणेला थेट लक्ष्य केले असून, VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना CID कडून चौकशीच्या नावाखाली VIP पाहुणचार दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान दुर्घटनेत अकाली मृत्यू झाल्यानंतर आता सीयआडीकडून तपास केला जात असून, व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही के सिंग यांची चौकशी करण्यात आली आहे.

व्हीएसआर विमान खरेदीची सीआयडीने सखोल चौकशी केली आहे. एकूण 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. विमानातील तांत्रिक बाबी सुरक्षा नियमांचे पालन आणि अपघाताच्या संबंधित मुद्द्याबाबत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली आहे.

दरम्यान त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. चौकशीदरम्यान सीआयडीकडून विमान खरेदीसह पायलट सुमित कपूरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

व्हीएसआर विमान भारतात कधी आणले? कोणाकडून खरेदी केले? याची सीआयडीने चौकशी केली आहे. व्हीएसआर कंपनीचे विमान किती तास चाललं? याचीही विचारणा करण्यात आली. व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या देखभालीबाबत व्ही के सिंग यांची सीआयडीकडून 8 तास चौकशी झाली.

पायलट सुमित कपूर यांनी अजित पवार यांना मुंबईवरून बारामतीला आणलं, तेव्हा त्याआधी त्यांचं कुटुंबातील सदस्यांसोबत वाद किंवा भांडण झालं होतं का? याचीदेखील विचारणा चौकशीदरम्यान करण्यात आली. तसंच पायलटचा स्वभाव कसा होता? त्याचा विमान चालवण्याचा परवाना किती वेळा रद्द झाला? त्यावर काय काय कारवाई केली? अपघाताच्या दिवशी त्याची ड्युटी कशी व कोणी लावली? याबाबतची देखील सीआयडी कडून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
"अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला #VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला CID ने चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झालीय. सकाळी ११ वाजता आल्यानंतर त्याची आठ तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला," असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली.. यामागं काय काळंबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं? पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी याप्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही".

"एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवून घेतला जात नाही पण दुसरीकडं ज्याच्या विमानाने अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही. के. सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादाने VIP ट्रीटमेंट दिली जाते? याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आतातरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे 'विश्वासू' सत्ताधारी आमदार जागे होतील का?," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.